संतोष नागरगोजे यांच्या इशाऱ्यानंतर साखर आयुक्तांनी केली पन्नगेश्वर कारखान्यावर कार्यवाही

महाराष्ट्र खाकी (रेणापूर) – शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध करून दिला. परंतु यंदाचा गाळप हंगाम संपत आला तरी राज्यातील 19 साखर कारखान्यांनी त्यांची साडेचार कोटींची बिले दिलेली नाहीत. उसाचा रास्त व किफायतशीर दर ( FRP) थकविणाऱ्या या साखर कारखान्यांविरुद्ध FRP ची (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांना साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीच्या नोटीस जारी केल्या आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. हा कारखाना पण आहे. शेतकऱ्यांचे,कर्मचारी,तोडवाहतूकीचे पैसे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पुढाकार घेतला आहे.

(जाहिरात)


पन्नगेश्वर शुगर मिल्स लि.पानगांव,ता.रेणापूर जि.लातूर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे,कर्मचारी,तोडवाहतूकीचे पैसे थकविल्यामुळे ते पैसे तात्काळ देण्यात यावे यासाठी मनसेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन अनेक आंदोलने करण्यात आले होते तसेच साखर आयुक्तांना 3 ते 4 वेळा निवेदन देण्यात आले होते. परंतु साखर आयुक्तांकडून साखर कारखान्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष्य मा.संतोष नागरगोजे यांनी सदरील साखर कारखान्यावर तात्काळ कारवाई करा साखर आयुक्त कार्यालयात तोडफोड करू असा इशारा साखर आयुक्तांना दिल्यानंतर आयुक्तांनी पन्नगेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे देण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले व विना परवाना गाळप प्रकरणी साखर आयुक्तांनी पन्नगेश्वर साखर कारखान्यावर 3 कोटी 17 लाख रुपये दंड आकारला आहे.यावेळी मनसे शेतकरी सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे उपस्थित होते.

Recent Posts