महाराष्ट्र

अधिवेशनातील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यामुळे BJP चे 12 आमदार निलंबित

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – महाराष्ट्रात आज पासून सुरु झाले आहे. अधिवेशन चालू असताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या बरोबर गैरवर्तन केल्या प्रकरणात बरा (12)विरोधी पक्षातील आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. OBC आरक्षणासंबधी ठराव संमत झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या
आमदारांनी धक्काबुक्की, शिवीगाळ व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली
आहे. या कारवाईत आशिष शेलार , अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, गिरीष महाजन,जयकुमार रावल, राम
सातपुते, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष पिंपळे, बंटी भांगडीया यासह काही आमदारांचा
समावेश आहे. या कारवाई नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्कटदाबीला बळी पडणार नाही असे
सांगत कामकाजावर बहिष्कार टाकला.

जाहिरात

“औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना मान्य केल की आम्ही थोडे अग्रेसीव्ह झालो होतो पण आम्ही भास्कर जाधव यांच्या अंगावर गेलो नाही की शिवीगाळ केली नाही, हे निलंबण विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी केले आहे असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे. आणि उद्या सरकारला काहीतरी करायचे असेल असेही अभिमन्यू पवार म्हणाले “

दुसरे सत्र चालु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर संसदीय
मंत्री यांनी ठराव केला. एक वर्षासाठी निलंबन करण्याचा ठराव मांडला. निलंबनच्या काळात मुंबई व नागपूर येथे
विधानसभेच्या आवारात येण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर हा ठराव संमत झाला. विधानसभेत आज
अधिवेशन सुरु झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांतील आमदारांनी एकमेकांना घेरत प्रश्नांची सरबत्ती केली.
विरोधकांच्या प्रश्नांवर सत्ताधारी सुध्दा आक्रमक झाले. त्यांनी त्यांना तशाच पध्दतीने उत्तर दिले. तर विरोधकांनी
सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न केला. एकुणच दोन दिवसाचे हे अधिवेशनाची सुरुवात आज वादळी झाली.
पण, पहिल्याच सत्रात आरोप – प्रत्यारोपावरुन धक्काबुक्की व शिवीगाळवर प्रकार घडल्यामुळे दुस-या
सत्रात आता त्याचे पडसाद पडले आहेत .

Most Popular

To Top