पोलीस

लातूर LCB गजानन भातलवंडे यांच्या टिमने 21 दिवसात आरोपीना अटक करून,खुनाचा गुन्हा आणला उघडकीस

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – दिनांक 15/06/2021 ते 16/ 06 /2021 चे दरम्यान रात्री वलांडी तालुका देवणी शिवारातील एका शेतात बालाजी बनसोडे, वय 35 वर्ष राहणार- बिहारीपूर ,तालुका मुखेड जिल्हा नांदेड याचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी दगडाने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून खून केला. व पुरावा नष्ट करण्यासाठी बालाजी शेषराव बनसोडे याच्या जवळील ओळखपत्र, मोबाईल ,कागदपत्र व बालाजी बनसोडे हा चालवीत असलेला महिंद्रा पिकअप घेऊन गेले. फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 184 /2021 कलम 302, 201 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत बालाजी शेषराव बनसोडे हा पिकअप गाडी चालून उपजीविका भागवीत होता. बालाजी बनसोडे याचा खून करण्याचे कारण व खून करणारे आरोपी हे अज्ञात असल्याने लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा दिनेश कोल्हे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्या होत्या. हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात होता.

(LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय व विश्वासनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी
1) विकास रघुनाथ सूर्यवंशी वय 29 वर्ष राहणार हेळंब
2 )ज्ञानेश्वर भारत बोरसुरे वय 21 वर्ष यांना मौजे हेळंब
तालुका देवनी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता नमूद आरोपींनी सांगितले की, आम्हास उदगीर येथे जायचे असल्याने आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याचे वाहनास आडवे येऊन हात करून थांबविले होते त्याच कारणावरून आमच्यात वाद झाला व त्या कारणावरून आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याचे डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले होते त्यात तो तो मरण पावला नंतर त्यास उचलून एका शेताच्या बांधाच्या बाजूला टाकले व त्याचे खिशातील मोबाईल फोन पाकीट व त्याचे वाहन घेऊन फरार झालो होतो असे सांगितले. त्यावरून आरोपीना अटक करण्यात आले आहे.गुन्ह्याचा अधिक तपास आणि गुन्हा करण्याचा नेमका उद्देश या संबंधाने देवणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कामठेवाड हे करीत आहेत.


हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,पोलीस अमलदार राजेंद्र टेंकाळे, रामहरी भोसले, राहुल सोनकांबळे, सदानंद योगी, योगेश गायकवाड ,सचिन धारेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खान, चालक अमलदार जाधव तसेच सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड,पोलीस हवालदार संतोष देवडे ,राजेश कंचे प्रदीप स्वामी, गणेश साठे ,रियाज सौदागर, शैलेश सुळे यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Most Popular

To Top