गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात C-60 पथकाची नक्षलवाद्या विरुद्ध मोठी कारवाई.

महाराष्ट्र खाकी( गडचिरोली ) – महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया कमी करण्यात गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना चांगले यश मिळत आहे असे दिसत आहे.काही महिण्यापुर्वी गडचिरोली पोलीस दलातील पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात C-60 पथकाने मोठी कारवाई केली होती. आणि आता 1 जुलै रोजी C-60 पथक व इतर अभियानाच्या जवानांनी मिळून एटापल्ली येथील कुदरी जंगलात जोखीम पत्करून अभियान राबिवले होते . गडचिरोली पोलिस दलाला नक्षलविरोधी अभियानात मोठे यश प्राप्त झाले आहे. या अभियानात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्र साहित्य व दारूगोळा हस्तगत केला. ठेकेदार, व्यावसायिकांकडून गोळा केलेली खंडणी देशविघातक कामासाठी वापरली जाते. या कारवाईने नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला असून गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांसह पोलीस अधीक्षक अंकित गोयल व त्यांच्या टीमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे

Recent Posts