लातूररोड येथील जवाणाच्या घरी दरोडा,10 तोळे सोने, 2 मोबाईल अन्य वस्तू घेऊन दरोडेखोर पसार

महाराष्ट्र खाकी ( चाकूर ) – लातूर जिल्ह्यातील चाकूर जवळील लातूररोड येथील भारतीय सैन्य दलातील जवानाच्या घरावर चोरांनी डल्ला मारून 10 तोळे सोने, 2 मोबाईलसह इतर वस्तू चोरांनी पळवला ही घटना चाकूर तालुक्‍यातील लातूररोड येथे दि 29/06/2021 वार मंगळवार पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चाकूर तालुक्‍यातील महाळंगी येथील सौदागर राजाराम चरक हे सध्या लातूररोड येथे नवीन घरात राहतात.चरक भारतीय सैन्य दलामध्ये जवान म्हणून आसाम राज्यात सेवा बजावत आहेत. 5 जूनला एक महिन्याच्या रजेवर ते गावी आले आहेत. दरम्यान, 4 जूलेला परत आसामला जाणार आहेत. मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घरासमोर चोरटे आलेची चाहूल चरक कुटूंबियांना
लागली. खिडकीतून बाहेर पाहिले असता हतात बॅटरी घेऊन असलेले लोक दिसून आले. त्यावर चरक यांच्या कंम्पांउड मधून दरोडेखोरांनी प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाजाला धक्के देऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चरक कुटूंबियांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून धमकाविले. तर अन्य दोघांनी घरातील एका कपाटातील सोन्याचे दागिने त्यात मिनी गंठण, लॉकेट, झुमके, सरपाळे असे दहा तोळ्याचे होते. दरोडेखोरांनी ते दागिने
पळवले. आणि जाताना चरक आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल दरोडेखोर घेऊन गेले.चोरीची घटना घडताच सौदागर चरक आणि शेजारी इरफान कोतवाल यांनी चाकूर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन चोरीची माहिती दिली. पोलिस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे,पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,पोउर्पाने खंडू दर्शने,पोहेकॉ हणमंत आरदवाड,परमेश्वर राख,दत्तात्रय थोरमोठे,पिराजी पुट्टरेवाड,तानाजी आरदवाड,सूर्यकांत कलमे यांनी घटनास्थळी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दाखल
झाले. जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी लावली.पोलिसांचे पथके दरोडे खोरांच्या शोधात रवाणा झाली आहेत . लातूर येथून श्वानपथकास बिलावले होते . सकाळी श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लातूर ते नांदेड हा राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा मार्ग दाखविला. अहमदपूर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता एका कारमधून दरोडेखोर जात असलेचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला. अहमदपूर येथील ITI भागात जाऊन चोरट्यांनी कार सोडून आंधाराचा फायदा घेत पळून गेले . कार नंबर MH.44 B .134 असा
आहे. ही कार २७ जून रोजी अंबाजोगाई येथून चोरीस गेली
होती.असे पोलीस निरीक्षक सिरसाट यांनी सांगितले. तिच कार आता पोलिसांच्या हाती लागली आहे. चाकूर पोलिस दरोडेखोरांच्या शोधात आहेत.लवकरच दरोडेखोर सापडले जातील.

Recent Posts