श्री केशवराज विद्यालया कडून PSI अमोल गुंडे यांचा कोविड यौद्ध म्हणून जाहीर सत्कार आणि सन्मान

महाराष्ट्र खाकी (लातूर) – मागच्या वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. लोकांचे व्यापार, नोकरी, काम बंद पडले लोकांचे हाल होऊ लागले त्यातून गरीब लोकांना कोरोना उपचारासाठी अडचणी येऊ लागल्या, सरकार मदत करत आहे पण रुग्ण संख्या ज्यास्त असल्यामुळे तीही अपुरी पडत होती. मग सरकारने लॉकडाऊन केला हा लॉकडाऊन पाळला जाईल यासाठी महाराष्ट्र पोलीस जीवाची बाजी लावून सेवा देऊ लागले, पोलीस आपले कर्तव्य करत होते आणि काही पोलीस त्या पलीकडेही जाऊन लोकांची आणि रुग्णांची सेवा करत होते. असे बरेच पोलीस आहेत त्यातील एक पोलीस अधिकारी म्हणजे लातूर पोलीस दलातील किल्लारी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक (PSI) अमोल गुंडे यांनी आपले कर्तव्य करत ज्या पद्धतीने रुग्णांची मदत केली त्या बद्दल अमोल गुंडे यांचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थानी त्यांचा सन्मान केला आहे. मागील आठवड्यात लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी PSI अमोल गुंडे यांचा सत्कार केला होता. आणि आज लातूर येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई 70 वा संस्था वर्धापन दिन व कोवीड -योध्दा सत्कार श्री केशवराज शैक्षणिक संकुल लातुर यांच्याकडून PSI अमोल गुंडे यांना सन्मानित करण्यात आले. अमोल गुंडे यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन जी सेवा केली आहे ती खूप प्रेरणादायी आहे. हा सन्मान त्यांच्या वर्दीतील माणुसकीचा आहे त्यांच्या आई -वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा आहे. लातूर शिक्षणअधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते अमोल गुंडे यांचा सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी लातुर ग्रामीण उपविभागाच्या पोलीस उप अधिक्षक सौ.प्रिया पाटील, किल्लारी पोलीस ठाणेचे पो.उप निरीक्षक अमोल गुंडे तसेच मनपा अंत्यसंस्कार करणारी टीम, वैद्यकीय सेवादेणारे अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार यांचा स्मृतीचिन्ह , पुस्तक देवुन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी श्री.यशंवतराव देशपांडे(अध्यक्ष स्थानिक समन्वय समिती लातुर, तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती तृप्ती अंधारे( शिक्षणाधिकारी लातुर) ,नितीनजी शेट्टे, धनंजय कुलकर्णी, बालासाहेब केंद्रे यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद माने यांनी तर आभार शिवाजीराव हेंडगे य‍ांनी केले.

Recent Posts