राजकारण

लातूर मधील भाजपाच्या चक्कजाम आंदोलनापेक्षा रमेश अप्पा कराड यांच्या भाषणाची आणि त्यांचीच चर्चा जास्त !

महाराष्ट्र खाकी (लातूर) – भारतीय जनता पार्टी लातूर तर्फे लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी वेगवेगळे समाज, पक्ष आंदोलन करत आहेत. न्यायालयाने OBC समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. म्हणून पूर्ण राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कडून आंदोलन करून OBC समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.लातूर मधील चक्का जाम आंदोलनात माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रेरणाताई होनराव, शैलेश लाहोटी,शैलेश गोजमगुंडे आदी बरेच नेते उपस्थित होते.

प्रत्येक नेत्यानी भाषणे केले पण चर्चा जास्त रमेश अप्पा कराड यांच्या भाषणाची झाली कारण रमेश अप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण आमदार धिरज देशमुख यांच्यावर तोफ डागली आणि आपले दुःख आणि राग वेक्त केला . लातूर ग्रामीणची लढत धिरज देशमुख यांनी नोटा विरुद्ध लढली. देशमुखांची पाठ लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही.आम्ही पूर्ण तयारी केली होती पण देशमुखांनी लातूर ग्रामीणची सिट विकत घेतली असेही रमेश अप्पा कराड म्हणाले. आली त्यानीं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कार्याबद्ध ही भाष्य केले.रमेश अप्पा कराड यांच्या भाषणाने कार्यकर्ते जोश मध्ये आले आणि रमेश अप्पा कराड यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या घोषणा देऊ लागले. घोषणे मुळे त्यानां आपले भाषण दोनदा थांबवावे लागले काही काळ तर असे वातावरण निर्माण झाले होते चक्काजाम आंदोलन आहे का रमेश अप्पा कराड यांची प्रचारसभा आहे ? आंदोलनाच्या स्टेजच्या बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे होर्डिंग (जाहिरात) होती.

ते पाहून तेथील लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या ! कारण रमेश अप्पा कराड यांनी काही वर्षाखाली राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता आणि त्यानां विधानपरिषदेचे आमदारकी साठी अर्ज भरून एका रात्रीत परत घेतला होता. याच गोष्टीवर लोक चर्चा करत होते की जर रमेश अप्पा कराड हे त्या वेळेस आमदार झाले असते तर आज रमेश अप्पा कराड यांचे विचार,भाषण आणि जगा वेगळी असती असे लोक चर्चा करत होते ! पण या आंदोलनाच्या माध्यमातून रमेश अप्पा कराड आणि लातूर भाजपने विरोधकांना आपली शक्ती दाखून दिली हे मात्र खर .

Most Popular

To Top