महाराष्ट्र

OBC आरक्षणाच्या मुद्यातून लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची राज्याच्या राजकारणात एंट्री ?

महाराष्ट्र खाकी (लोणावळा) – लातूरचे राजकारण आणि राजकीय नेते यांची काम करण्याची तऱ्हाच निराळी आहे. याचा अनुभव राज्याने आणि देशाने विलासराव देशमुख यांच्या रूपाने पहिला आणि अनुभवला आहे. विलासराव देशमुख यांचा आदर्श ठेऊन ज्यांनी राजकारणात पदार्पण केलेले लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अतिशय कमी कालावधीत लोकांच्या मनात जगा निर्माण केली आहे. आणि आता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पुढचे पाऊल टाकत OBC आरक्षण च्या मोहिमेत पदार्पण करून एक प्रकारे राज्याच्या राजकारणात प्रवेश म्हणा किंवा सुरुवात केली आहे कारण लोणावळा येथील OBC चिंतन मंथन शिबिरात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी खूप अभ्यासपूर्वक आपले मत मांडले . स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे.

यामुळे भविष्यात ओबीसी समाजातील विविध घटक संकटात सापडणार आहेत. राजकीय आरक्षण न टिकल्यास राज्यकर्त्यांवरील दबाव कमी होईल. पर्यायाने भविष्यात नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणासही ओबीसींना मुकावे लागेल. त्यामुळे राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या हे आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व मिळत आहे. जर आरक्षण नसते तर मागासले समाजातून नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यपद मिळाले नसते. समाजातील एका व्यक्तीला पद मिळाले तर त्या समाजातील हजारो व्यक्तींना लाभ होतो. आरक्षणामुळे समाज प्रगतीच्या वाटेवर चालू लागला आहे. हे आरक्षण रद्द झाले तर समाजाची मोठी हानी होणार आहे. यासाठी आरक्षण टिकण्याची गरज आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सर्व रस्ते कायमचे बंद झालेले नाहीत तर इम्पेरियल डाटा मागवलेला आहे. राज्य सरकारने हा डाटा लवकरात लवकर न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे.हे आरक्षण टिकवायचे असेल तर केवळ OBC या एकाच तत्वावर एकत्र यावं लागेल. जात, पात, पक्ष त्यांचे झेंडे व त्यासोबत असणारे रंग बाजूला ठेवून फक्त OBC जगला पाहिजे, ओबीसी वाचला पाहिजे या भावनेतून काम करावे लागणार आहे. OBC आरक्षणाच्या हक्कासाठी पक्षाचा विचार ना पदाचा फक्त समाजासाठी लढायचं. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ओबीसी नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन झालेल्या लोणावळा येथील ओबीसी चिंतन मंथन शिबिरात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात OBC नेत्या पंकजाताई मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे, माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्व OBC नेते आणि समाजबांधवांची उपस्थिती होती. हीच OBC आरक्षण हक्कासाठी झालेली एकजूट राज्यास दिशादर्शक ठरणार आहे असे मत व्यक्त केले.

Most Popular

To Top