लातूर जिल्हा

मुरुड हद्दीत सावरगाव खून प्रकरणातील फरार आरोपीला लातूर LCB टिमने केली अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर LCB चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या कार्याचा सपाटा चालूच आहे.लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव शिवारात अनैतिक संबंधाच्या कारणावरून मार्च (2021) महिन्यात खूनाची घटना घडली होती. त्याची मुरुड पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, खुनाच्या घटनेपासून या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास हिंगे हा फरार झालेला होता, या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती परंतु विकास हिंगे हा सोलापूर, पुणे, मुंबई भागात पोलिसा पासून लपून राहात होता. लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी ,लातूर (ग्रामीण) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली(LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात विविध गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याची मोहीम सुरू आहे या मोहिमेमध्ये (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले


,प्रकाश भोसले , बालाजी जाधव, सिद्धेश्वर जाधव , सुधीर कोळसुरे व पोलीस ठाणे मुरुड येथील पोलिसांचे एक पथक तयार करून फरार आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे. अशी गोपनीय माहिती (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाली या माहिती वरून विकास हिंगे यास वरील टीमने लातूर येथून ताब्यात घेतले व मुरुड पोलीसध्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोणे हे करीत आहेत.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top