लातूर मधील स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पास महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि प्रा. मोटेगावकर सरांची भरीव निधीची मदत

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. पहिली लाट येऊन गेली पण दुसऱ्या लाटेत भारतासह महाराष्ट्र होरपळून निघाला. त्यात लातूरही होतेच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमी असल्यामुळे भारतात, महाराष्ट्रात आणि लातूर मध्ये खूप जास्त प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला. लोकांची आणि प्रशासनाची ऑक्सिजनची वेवस्था करण्यात काय अवस्था झाली हे सर्वांनी पहिले आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असे मेडिकल तज्ञ् सांगत आहे. म्हणून लातूर शहरात काही डॉक्टर आणि समाजसेवक यांनी लोकसहभागातून देणगी जमा करून “नरसिंह प्रतिष्ठान” च्या वतीने ‘स्पंदन’ अक्षय संजीवनी हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. दररोज 160 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे.

संजय अयाचित यांचे महत्वाचे योगदान आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी हा प्रकल्प महत्वकांशी ठरणार आहे.या प्रकल्पाला मदत करत आहे. या स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पासाठी RCCचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या वतीने 2 लाख 51 हजार रुपयांचा निधीजिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदरील निधीचा धनादेश देताना मिनल मोटेगावकर. समवेत डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. आरदवाड, डॉ. वैशाली टेकाळे ई होते.

तसेच या प्रकल्पासाठी काल 1/6/2021रोजी गोजमगुंडे परिवाराच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे योगदान दिले.यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ संजयजी पांडे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी ननंदकर, डॉ.विश्वासजी कुलकर्णी आणि रंगकर्मी संजयजी आयाचित यांच्याकडे सुपूर्द केली. आपण ही या महत्वकांशी ‘स्पंदन’ प्रकल्पाला हातभार लावावा. आपल्याला शक्य होईल तितकी मदत करावी असे अहवान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरच्या जनतेला केले आहे.

Recent Posts