पोलीस

लातूर शहर DYSP जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात MIDC पोलिसांनी 43 पिशव्या गांज्या पकडला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात आणि शहरात गांज्या, बनावट दारू आणि वेश्या व्यवसाय बिनधास्त पणे व्यवसाय चालतो ही चर्चा आणि लोकांच्या तक्रारी येत होत्या याच आधारे महाराष्ट्र खाकी टिमने सत्यता तपासून काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील आणि शहरातील गांज्या विक्री वर एक बातमी प्रसिद्ध केली होती. याच अनुषंगाने लातूर शहर DYSP जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व MIDC पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस ठाणे MIDC मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.
मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे पथकांनी खाडगाव ते 5 नंबर जाणारे रिंगरोड वर  गोपनीय माहिती मधील एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ज्याचा क्रमांक MH.24 AF. 2095 असा असलेली कार येताना दिसली सापळा मधील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कार थांबवून त्या कारची झडती घेतली असता त्या कारचे पाठीमागील डिक्की ची शासकीय पंचा समक्ष झडती घेतली त्या मध्ये प्लास्टिकच्या 43 पिशव्या मध्ये तब्बल 94.6 किलोग्राम इतक्या वजनाच्या हिरव्या रंगाचा बीमिश्रित गांजा आढळून आला. 3 आरोपी अटक लातूर पोलिसांची दमदार कारवाई.


       त्यावरून पोलीस ठाणे MIDC येथे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे फिर्याद वरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 346/2021 कलम 20 (B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात वरील 03 आरोपीताना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ज्या कार मधून गांजाची वाहतूक करण्यात येत होती ती कार असा एकूण 14 लाख 86 हजार 730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत.

Most Popular

To Top