महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या कार्याचा धूमधडाका सुरच आहे.लातूर शहरात चोरी, दरोडा टाकून शहरात धुमाकूळ घालणारा गुन्हेगार शेखर संतोष पाटोळे यास अटक करण्यात लातूर LCB पथकला यश आले आहे.दरोडा ,जबरी चोरी ,घरफोडी आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे करणाऱ्या फरार आणि पाहिजे असणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आदेश दिले होते. यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते .या पथकाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव ,श्रीमती प्रिया पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध फरार आणि पाहिजे असणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते . दिनांक 31 मे 2019 रोजी जबरी चोरी घरफोडी आणि गंभीर दुखापती चे गुन्हे करणारा आणि लातूर ग्रामीण येथील गुन्हा रजिस्टर नंबर 50 /2021 कलम 307 या गुन्ह्यात पाहिजे असणारा अट्टल गुन्हेगार संतोष शेखर पाटोळे राहणार जय नगर लातूर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे संतोष शेखर पाटोळे याच्यावर पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण ,विवेकानंद चौक ,शिवाजी नगर ,गांधी चौक सह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यातच लातूर ग्रामीण येतील गुन्हा रजिस्टर नंबर 50 /2021 कलम 307 या गंभीर गुन्ह्यात गुन्हा घडल्यापासून तो फरार होता काल रोजी तो औसा रोड वरील एका ढाब्याच्या मागे बसलेला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार अंगद कोतवाड ,युसुफ शेख ,राजेभाऊ म्हस्के ,सचिन धारेकर ,नितीन कटारे ,नागनाथ जांभळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला, पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणारा अट्टल गुन्हेगार संतोष शेखर पाटोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,फरार गुन्हेगारास अटक
- Maharashtra Khaki
- June 1, 2021
- 4:00 pm
Recent Posts
लातुरात विसर्जन मिरवणुकीवर लातूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दोन हजार पोलिसांसह सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन ची नजर
September 16, 2024
No Comments
LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून LCB ची धडाकेबाज कारवाई
September 15, 2024
No Comments