महाराष्ट्र खाकी (देवणी) – लातूर जिल्ह्यात सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन चालू आहे. मेडिकल आणि जीवनावश्यक वस्तू ची आस्थापणे सोडून सर्व आस्थापणे बंद आहेत. पण अवैध धंदे काही बंद होण्याचे नाव घेत नाहीत. पण लातूर पोलीस अधीक्षक आणि लातूर LCB यांच्या सतर्कत्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे खूप प्रमाणात कमी झाले आहेत. लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आले आहेत . त्यापैकी जिल्ह्यात एका पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे पोलिस ठाणे देवणी हद्दीत विनापास परवाना देशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशीदारूची वाहतूक करण्यात येत आहे.अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरोळ चौकात सापळा लावला आणि बातमी नुसार एक पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन क्रमांक M.H.24 A. U.-5156 अशी रोडने येताना दिसली.पथकाने या पिकअप व्हॅन ला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे 194 बॉक्स व 174 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.
त्यावरून देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे 1)नागनाथ गंगाधर बिराजदार, वय 28 वर्ष, राहणार- वडमुरंबी, तालुका देवणी 2)सागर मोरखडे, राहणार-निटूर तालुका शिरूर आनंतपाळ यांचे विरोधात पोलीस ठाणे देवणी येथे गुरनं 457/2021 कलम 269,188 भादवि, कलम 65(अ)(ई), 81,83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम 51,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, covid-19 उपाय योजना नियम 2020 चे नियम 11 व साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1997 चे कलम 234 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार कांबळे हे करत आहेत.