
महाराष्ट्र खाकी (आंबेगाव) – कोरोनाच्या या महामारीत पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपली जिम्मेदारी पूर्ण जिद्दीने आणि ताकतीने निभावत असतानाच सोमवारी तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने आपत्ती व्यवस्थापन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मागील वर्षभरापासून कोविड योद्धे म्हणून आपले कर्तव्य चोख बजावतानाच चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटातही पोलीस दल जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहे,याचा मला अभिमान वाटतो. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केली आहे.

