लातूर जिल्हा

लातूर येथील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस मिळणार जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर भव्य प्रशासकीय इमारत व नियोजन भवन उभारणार

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाची कठीण परिस्थिती उत्तम रीतीने हाताळली आहे. विशेषतः विलासराव देशमुख वैदयकीय विज्ञान संस्थेने कामगिरी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात चांगल्या रीतीने काम केले आहे. या संस्थेची जगा कमी पाडत आहे हे लक्षात घेऊन जुने रेल्वे स्थानकाची जगा द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी मान्य करून लातूर येथील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस घेऊन त्या बदल्यात राज्यशासनाने राज्यातील इतर ठिकाणची जागा रेल्वेला देणे बाबत केलेली मागणी महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली असून त्या बाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस नजीकच असलेली जुन्या रेल्वेस्थानकाची जागा देण्यात यावी, त्या बदल्यात राज्यातील इतर ठिकाणची राज्यशासनाची जागा रेल्वेला देण्याचे ठरले होते मात्र सदरील कार्यवाही पूर्ण होण्यास दिरंगाई झाल्यामुळे वैदयकीय महाविदयालयाच्या महत्वाचा प्रकल्प उभारणीचे काम थांबलेले आहे, या संदर्भाने दिनांक 20/05/2021 गुरूवारी ना. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी बैठकी दरम्यान झालेल्या चर्चे दरम्यान लातूर येथील रेल्वेची जागा वैदयकीय महाविदयालयात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या सोबतच पूणे व लातूर येथील जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नियोजन भवन व प्रशासकीय इमारत उभारणी

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेत भव्य प्रशासकीय इमारत व नियोजन भवन उभारणीच्या संदर्भानेही या बैठकीत चर्चा झाली भाडयाच्या जागेत असलेली सर्व शासकीय कार्यालये एकत्रितरीत्या या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीत आणावीत असा निर्णय यावेळी झाला आहे.
या बैठकीस बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच वास्तूविशारद हितेन सेठी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Most Popular

To Top