महाराष्ट्र खाकी ( सोलापूर ) - सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची आज राज्यसेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली. त्यांची 2016 च्या भारतीय वनसेवेचे( IFS) तुकडीत नियुक्ती झाली असून राज्यसेवेतून वनविभागात या पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.यापूर्वी राज्यात वनविभागात विविध पदावर महिला अधिकाऱ्यांनी काम केले आहे परन्तु राज्यसेवेतून IFS होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.वनविभागात आजपर्यंत वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल या पदावर महिलांनी काम केले होते परंतु 2009 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पहिल्यांदाच सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग 1 च्या पदावर 8 महिलां व 25 पुरुषांची नियुक्ती केली गेली. त्या तुकडीचे 6 अधिकारी भारतीय वनसेवेत दाखल झाले असून त्यापैकी सुवर्णा माने या एकमेव महिला असून त्या या पदावर राज्यसेवेतून जाणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (IAS )भारतीय प्रशासकीय सेवा,(IPS)भारतीय पोलिस सेवा व( IFS)भारतीय वन सेवा या तीन अखिल भारतीय सेवेमध्ये सरळसेवेने व राज्यसेवेतून पदोनीतेने अधिकाऱ्यांची नियुक्ती करते. त्यात भारतीय वनसेवेत सुवर्णा माने यांची निवड झाली असून त्यांचा समावेश 2016 च्या तुकडीमध्ये करण्यात आला आहे. सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्यातील वशिंबे या गावच्या असून त्यांचे सासर वैराग, तालुका बार्शी हे आहे, त्यांचे पती रविंद्र माने हे सध्या प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत
Recent Posts
खाकी फाऊंडेशनचा निलंगा मतदारसंघात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना पाठिंबा
November 12, 2024
No Comments