महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आळा घालताना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. घराच्या बाहेर पडू नका, सर्व आस्थापणे बंद आहेत. या सर्व नियमांना धाब्यावर बसवत जिल्ह्यातील चाकूर येथील नगरपंचायती येथील अधिकारी-कर्मचारी दारू आणि मटण पार्टी करत असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली याची खात्री करण्यासाठी काही नागरिक चाकूर शहराबाहेरील हॉटेलला गेले त्यानां पार्टी चालू असल्याचे दिसून आहे .नागरिकांनी या पार्टीचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केले . हि पार्टी चाकूरच्या नगर पंचायतीचे पाणीपुरवठा आणि स्वछता अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती
कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे ह्यांनी मटन आणि दारू पार्टी
आयोजित केली होती, ही पार्टी चाकूर शहराबाहेरिल एका हॉटेलवाल्यास हॉटेल उघडायला लावून हॉटेलच्या आतील रूम मध्ये हे सर्व कर्मचारी दारू पित आणि मटन खाताना आढळून आले. यावेळी उपस्थित असलेल्या काही तरुण तरुणांनी त्याचे व्हिडियो घेत असताना अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकात झटापट झाली काही वेळात हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आला होता . या ग्रामस्थांनी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे याच्याकडे करत यातील दोषी लोकावर तातडीने कारवाईची मागणी चाकूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सदरच्या पार्टीतील सत्य काय आहे, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिले आहेत. या दारू मटण पार्टीत कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे स्पष्ट सांगितले आहे.
