पालकमंत्री सतेज(बंटी)पाटील यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार मजवला आहे रुग्ण बरे व्हावेत यासाठी राज्यातीन वैद्यकीय सेवा सज्य आहेत पण काहीतरी कमी पडत आहे. कधी ऑक्सिजन तर कधी रेमडीसीवीर ही परिस्थिती सर्वच जिल्ह्यात आहे. प्रत्येक पालकमंत्री यांनी आपल्या जिल्ह्यातील जमेलतसा आढावा घेतला रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहेत . मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने या कोरोनाचे नियोजन बद्ध काम केले आहे.आणि जिल्ह्यात वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांना त्वरीत उपचारासाठी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे उपस्थित होते. जिल्ह्यातील रुग्णांलयाची ऑक्सिजनची मागणी जिल्ह्यास होणारा ऑक्सिजन पुरवठा या बाबी विचारात घेऊन कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रस्तरावर पत्र व्यवहार करण्याबाबत पालकमंत्री श्री.सतेज पाटील यांनी सूचित केले आहे.

Recent Posts