लातूर जिल्हा

पालकमंत्री अमित देशमुखांच्या मार्गदर्शनात जम्बो कोवीड सेंटरचे काम सुपर फास्ट सुरु

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर मधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन लातूरात लवकरच जम्बो कोवीड केअर सेंटर उभारण्यात येईल. लातूर जिल्हयातील ऑक्सिजनचा पूरवठा आता सुरळीत झाला आहे. आगामी काळातही तो नियमीत होत राहील चिंता करून नये, रेमेडीसीवीर इंजेक्शन पूरवठा वाढवीला आहे. आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतर औषधे व व्यवस्थाचेही नियोजन करण्यात आले आहे, असे सागून डॉक्टर मंडळीनी रूग्णांची चांगली काळजी घेऊन जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दोन दिवसापूर्वी केले होते आणि

लातूरवासीयांच्या सेवेत नवे जंबो कोविड सेंटरचे काम पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे ग्रामदैवत श्री.सिध्देश्वर देवस्थान येथे उभारण्यात येत आहे. याठिकाणी लातूरच्या जनतेसाठी 100 ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि मनपातर्फे हे जंबो कोविड सेंटर लवकरच लातूरवासीयांच्या सेवेत रुजू होईल. याठिकाणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पाहणी करुन आवश्यक त्या सर्व सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी मनपा अधिकार उपस्थित होते.

Most Popular

To Top