कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शहरात 75 टक्के लसीकरण पूर्ण – मुख्याधिकारी स्वरूप खारगे

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – 1 एप्रिल पासून 45 वर्षांपुढील नागरिकांकरिता लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पन्हाळा शहरात मोठ्या संख्येने लसीकरण होत आहे. पन्हाळा शहरात आत्तापर्यंत एकूण 75 टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पन्हाळ्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिली.
नगरपरिषदेचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती देत आहेत. याकरिता वॉर्ड निहाय पथके तयार केली असून ही पथके घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यास आवाहन करत आहेत. पन्हाळा शहरातील वॉर्ड क्रमांक 5 व 8 येथे बहुतांश मुस्लिम बांधव राहत असून पवित्र रमजान महिना सुरू असल्याने अनेक बांधवांना रोजाच्या उपवासामुळे लस घेणे अडचणीचे जात होते. यासाठी नगरपरिषदने वैद्यकीय अधीक्षक श्रीमती गायकवाड यांना विनंती करून विशेष बाब म्हणून मुस्लिम बांधवांकरिता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री 8.30 वाजेपर्यंत लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याविषयी विनंती केली. आता मुस्लिम बांधवांना दिवसाचा रोजाचा उपवास संपल्यानंतर जेवण झाल्यानंतरही लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


नगरसेवक असिफ मोकाशी यांच्यासोबत श्री. खारगे व नगरपरिषदेच्या पथकाने प्रत्येक घरात भेट देऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. श्री. खारगे म्हणाले, शहरातील प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागात लसीकरणाविषयी आवाहन करून सहकार्य करीत आहेत. यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता लवकरात-लवकर लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले.

Recent Posts