महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे आवश्यक दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण परवानगी नसलेले काही दुकानदार नियमाला पायदळी तुडवून चोरून दुकान उघडत आहेत लातूर शहरातील लाहोटी कम्पाऊण्ड येथे महालक्षमी टेक्सटाइल हे दुकान चालू असल्याची माहिती मिळताच झोन D चे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांचे मार्गदर्शना खाली आज महालक्षमी टेक्सटाइल दुकानावर धाड टाकून त्यांच्याकडून रु 15,000/ दंड आकारण्यात आला तसेच विना कारण बाहेर फिरणारे नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन एकूण 21000/ रु.दंड वसूल करण्यात आला.लातूर शहरात काही दिवसापूर्वी अश्याच काही दुकान उघडण्याची परवानगी नसताना व्यापार करणाऱ्या 05 दुकानांना सील करण्यात आले.
या मोहिमेत झोन डीचे झोनल अधिकारी बंडू किसवे ,गांधी चौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. हिबारेसाहेब, स्वच्छता निरीक्षक सोनवणे डी. एस.,रवि कांबळे,अम
जद शेख,, हिरालाल कांबळे, नितीन घोडके देवीदास कोठवाड व कर्मचारी उपस्थित होते. हि कार्यवाही लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आणि महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशावरून केली आहे.