लातूर जिल्हा

Pi सुनीलकुमार पुजारी यांची धाड टाकून कॅफेमध्ये स्नूकर खेळणाऱ्या 12 जनावर दांडात्मक कारवाई.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनामुळे राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. सर्व दुकाने, हॉटेल बंद आहेत केवळ मेडिकल, किराणा दुकान आणि भाजी ई चे दुकाने चालू आहेत तेही कडक नियमासह आणि मर्यादित वेळेपूरतेच. पण लातूर शहरातील सवेवाडी येथील दिवाणजी मंगलकार्यालय जवळ प्रवीण माने यांचा ब्लॅक स्पॉठ नावाचा कॅफे आहे. हा कॅफे बंदी असताना चालू होता आणि कॅफेमध्ये गर्दी जमली आहे याची माहिती महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी कॅफेवर छापा टाकला आणि स्नूकर खेळणार्‍या 12 जणांवर महानगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने कारवाई केली आणि कॅफे चालक प्रवीण माने आणि स्नूकर खेळणार्‍या 12 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये व कॅफेचाळक प्रवीण माने यांच्याकडून 10 हजार रुपये असा एकूण 16 हजार रुपयांचा दंड यावेळी वसूल करण्यात आला आहे. हि कार्यवाही लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिळ पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशावरुन करण्यात आली
आहे.

Most Popular

To Top