लोकसेवेला धर्म मानणाऱ्या गोजमगुंडे परिवाराकडून कोरोनाच्या कठीण काळात दोन रुग्णवहीका लातुकरांच्या सेवेत.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर मधील असेकही परिवार आहेत जे लातूरच्या काठीण काळात लातुकरांच्या मदतीला धावले आहेत. आज गोजमगुंडे परिवाराने कोरोनाच्या कठीण परिस्थितीत जिथे आरोग्य सेवा गरजेच्या आहेत या साठी स्वखर्चातून दोन रुग्णवाहिका लातूरकरांसाठी दिल्या आहेत.गोजमगुंडे परिवारातून विक्रमजी गोजमगुंडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लातूरकरांसाठी लोकउपयोगी कार्य केले आहे आणि त्यांचाच लोकसेवेचा वारसा पुढे नेत लातूरचे तरुण लोकप्रिय महापौर विक्रांतजी गोजमगुंडे हे आणखी प्रभावीपणे लातूरकरांची सेवा करत आहेत.

कोरोना काळात लातूरकरांच्या समस्या आणि आरोग्यसेवेच्या आवश्यकता पाहून गोजमगुंडे परिवाराने स्वखर्चातून दोन रुग्णवहीका लातूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांना या कोरोनाच्या काळात काही अनुभव आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या कठीण काळातही गोजमगुंडे परिवार लातूरकरांसाठी धावून आले याचे भान लातूरकर कधीच विसरणार नाहीत हे मात्र नक्कीच आहे. विक्रमजी गोजमगुंडे यांनी विलासराव देशमुख यांच्या सोबत राहून लातूरकरांसाठी कामे केली तसेच विक्रांतजी गोजमगुंडे हे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत राहून लातूरकरांची सेवा करत आहेत.

महापौर विक्रांतजी गोजमगुंडे काय म्हणाले

“सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि समोर दिसत असलेल्या भयावह परिस्थितीवर मात करण्यासाठी मनपा प्रशासन प्रामाणिक पणे लढत आहे. अनेकजण या लढ्यात आरोग्य सेवेसाठी आप-आपल्या परीने जेवढी शक्य आहे तेवढी मदत करत आहे. याबाबत लातूर शहराचा प्रथम नागरिक या नात्याने मी त्यांचा सदैव ऋणी असणार आहे.

आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर अनेक यंत्रसामग्रीची आवश्यकता असताना वैयक्तिक मला काही अनुभव आले आणि यातून गोजमगुंडे परिवाराच्या वतीने आम्ही स्वखर्चातून लातूरकरांच्या सेवेसाठी २ रुग्णवाहिका समर्पित करत आहोत. मला माहीत आहे दोनच रुग्णवाहीका सर्वांसाठी उपयुक्त ठरण्यासाठी पुरेशा नाहीत पण या अडचणीच्या वेळी नक्की उपयुक्त ठरतील आणि अनेकांना जीवदान देतील.”

या दोन्ही रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी स्वतः महापौर विक्रांतजी गोजमगुंडे आणि महानगरपालिका आयुक्त अमनजी मित्तल तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

Recent Posts