महाराष्ट्र खाकी ( सातारा ) – सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेच्या अनुषंगाने दि. 30 एप्रिल पर्यंत कलम 144 लागु केला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने/स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खादयपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने फक्त सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील.
मेडिकल दुकाने ही सकाळी 7.00 ते रात्री 08.00 पर्यंत चालू राहतील व हॉस्पीटल मधील मेडिकल दुकाने पुर्णवेळ चालू राहतील.
वृत्तपत्रे/मासिके/नियतकालिके याची घरपोच सेवा सकाळी 5.00 ते सकाळी 11.00 व स्टॉल वरील विक्री सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत चालू राहील.
या आदेशांची अंमलबजावणी दिनांक 20 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजल्यापासून ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यत लागू राहील
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
किराणा माल, मेडिकल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी
- Maharashtra Khaki
- April 20, 2021
- 3:49 pm
Recent Posts
अहमदपूर मातरदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव जाधव यांची प्रचारात आघाडी
October 25, 2024
No Comments
माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांचे केले मनःपूर्वक अभिनंदन
October 24, 2024
No Comments
श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या उपस्तित भव्य रॅली काढून महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार उमेदवारी अर्ज भरणार
October 24, 2024
No Comments