महाराष्ट्र खाकी (सातारा) – कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या. गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सूचना केल्या. पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन शंभूराज देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
लॉकडाऊन लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश
- Maharashtra Khaki
- April 20, 2021
- 12:44 pm
Recent Posts
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments