देश

आतापर्यंत देशात कोविड लसीकरणाचा 12 कोटी 25 लाखांचा टप्पा पार.

महाराष्ट्र खाकी – संपूर्ण देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा 12 कोटी 25 लाखांचा टप्पा पार झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या 92व्या दिवशी काल रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या एकंदर 25,65,179मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत लसीकरण झालेल्यांमध्ये  91,27,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून 57 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे.

या व्यतिरिक्त आघाडीवर काम करणाऱ्या 1 कोटी 12 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा , तर याच गटातल्या जवळपास 55,00,000 लाख कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

45 ते 60 वर्षं वयोगटातल्या चार कोटींहून अधिक लाभार्थींनी  लसीची पहिली मात्रा  घेतली असून 10,00,000 जणांनी दुसरी मात्राही घेतली आहे.  

Most Popular

To Top