महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर यांनी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील संपूर्ण कोरोना कामकाजाचा आढावा घेतला. शहरात रेमिडीसिवर इंजेक्शन सुलभरित्या उपलब्ध होण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या तसेच खाजगी तपासणी केंद्र केंद्रामधून सिटी स्कॅन, आरटीपीसी आर, अँटीजन चाचणी शासन मान्य दरानेच केल्या जात असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या.
लातूर शहरात झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना रेमिडीसिवर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे, परंतु रुग्णांना इजेक्शन सहजतेने उपलब्ध होत नसल्याचे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत इंजेक्शनचा अनधिकृत साठा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच खाजगी मान्यताप्राप्त रुग्णालय यांना दैनंदिन लागणाऱ्या इंजेक्शन चे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.
लातूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांना रेमिडीसेवर इंजेक्शन उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना आणि खाजगी केंद्रामधून सिटी स्कॅन, आरटीपीसी आर, अँटी जन चाचणी शासन मान्य दरानेच केल्या जाव्या. प्रत्येक प्रभागात मनपा किमान एक लसीकरण केंद्र सुरू करणार.
जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना अमितजी विलासरावजी देशमुख यांनी देखील लातूर शहरास रेमिडीसिवर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही याकरिता शासन स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत. पालकमंत्री महोदय स्वतः या बाबत प्रयत्नशील आहेत.
लातूर शहरात अनेक खाजगी चाचणी केंद्र येथे सिटी स्कॅन, आरटीपीसी आर, अँटीजन चाचणी करिता शासन मान्य दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जावू नये हे सुनिश्चित करण्यासह प्रत्येक खाजगी चाचणी केंद्र येथे शासन मान्य दर दर्शविणारा फलक लावला जाईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील नागरिकांना वेळेत लसीकरण पूर्ण करण्याच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात किमान एक लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. सद्य परिस्थितीत लातूर शहरात मनपाचे 5 लसीकरण केंद्र सुरू असून येत्या दोन दिवसात आणखी 6 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ही संख्या किमान 18 करण्याबाबत आरोग्य विभाग आराखडा तयार करीत आहे. यावेळी उपायुक्त मयुरा शिंदेकर, डॉ कलवले इत्यादी उपस्थित होते.