कळंब शहर पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी मध्यरात्री बनावट नोटा बाळगणाऱ्याला पकडले.

महाराष्ट्र खाकी (उस्मानाबाद) – उस्मानाबाद जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट समोर आले आहे. हे रॅकेट कळंब शहरात असून एका तरुणास अटक करून त्याच्याकडून 500 व 200 रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एक व्यक्ती बनावट नोटा जवळ बाळगून तो व्यवहारामध्ये नोटा वापर करत आहे अशी बातमी कळंब शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांना शुक्रवारी मिळाली होती . त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपास सुरू केला. मध्यरात्री पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, हवालदार शिवाजी राऊत, S. L. हांगे, अमोल जाधव, सुनील कोळेकर व रेखा काळे यांनी शोध घेऊन त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. तत्काळ पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यास त्याचे नाव व गाव विचारता त्याने त्याचे नाव असद ताहीर अली सय्यद वय 24 , रा. बाबानगर, कळंब सागितले. या व्यक्तीस विचारपूस करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या 3 नोटा व 200 रुपयांच्या बनावट 5 नोटा मिळाल्या . त्याची चौकशी करून घराची झडती घेतली तेव्हा घरामध्ये भिंतीच्या कपाटामध्ये 500 रुपयांच्या 2 बनावट नोटा सापडल्या. त्यामध्ये एका नोटेवर क्र.OBB 051607 व दुसऱ्या नोटावर भारतीय रिझर्व्ह बँक जिचा क्र. 8 AD 627223 आढळून आला. याप्रकरणी असद ताहीर अली सय्यदविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Recent Posts