लातूर जिल्हा

लातूरचे पालक मंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेनुसार एक आगळा वेगळा उपक्रम राबवून माधव दादा गंभीरे यांचा वाढदिवस साजरा.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – दि. 2 एप्रिल 2021 रोजी सिकंदरपूरचे युवा नेतृत्व तथा सरपंच सेवा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष माधव दादा गंभीरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिकंदरपूर येथील शिवभक्त मित्र मंडळ व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने लातूरचे पालक मंत्री अमित भैय्या देशमुख साहेब यांच्या संकल्पनेनुसार एक आगळा वेगळा उपक्रम राबवून माधव दादा गंभीरे यांना जन्म दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.!
कोवीड – 19 ला घाबरुन न जाता व फक्त मतदाना पुरते लोकासमोर न जाता त्यांच्या आरोग्याची जबाबदारी हीच माझ गाव माझी जबाबदारी समजून व स्वतः स्वीकारुन गावातील 45 वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील 128 नागरीकांचे कोरोना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र – गंगापूर येथे करुन घेण्यात आले. राहिलेल्या 100 % नागरीकांचे कोरोना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येऊन गावातील सर्व नागरीकांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे ठरुन आज प्रातनिधीक स्वरुपात किराणा दुकानदार,केस कर्तनालय,दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते अटोचालक, गुमास्ते, आशा 50 महीला व पुरुषांची कोरोना चाचणी करण्यात आली व राहिलेल्या लोकांची चाचणी टप्पा टप्प्याने पुढील काळात करुन घेण्याचा व गाव कोरोना मुक्त करण्याचा निर्धार गावातील ग्राम पंचायत सदस्य व शिवभक्त मित्र मंडळाच्या तरुणांनी केला आहे.!
शिवभक्त मित्र मंडळ व ग्राम पंचायतीच्या वतीने कोरोना लसीकरणासाठी जात असलेल्या नागरीकांसाठी आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहनांची सुविधा करण्यात आली होती.


स्वंय सेवक घरोघरी जाऊन नागरीकांना कोवीड लस घेण्यासाठी व कोवीडचे शासन निर्देश पाळण्यासाठी प्रेरीत करुन लसीकरणाच्या आॕनलाईन नोंदी करीत होते.
सदरील कार्यासाठी गंगापूर आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी प्रताप ईगे,आरोग्य अधिकारी डाॕ.चंद्रशेखर जाधव,आरोग्य सेविका सौ.के.डी.नरहारे,आरोग्य सेवक एस.बी.पवार,आशा कार्यक्रत्या मंगल बोकणे,नंदा बोयणे व आरोग्य कर्मचारी तसेच गावातील शिवभक्त तरुण मित्र मंडळ पदाधिकारी ,ग्राम पंचायतीचे सरपंच सौ.रेशमा माधव दादा गंभीरे,उपसरपंच पिराजी ईटकर,पाडूरंग ताटे,राजकुमार अडसुळे,श्रीमंत गरगटे,दिगबंर कदम,तानाजी कोकाटे,सुरेश लष्कर, व ग्राम पंचायत सदस्य यांनी प्रयत्न केले.!

Most Popular

To Top