देश

छत्तीसगड मध्ये नक्षलवादी आणि पोलिसात चकमक.

महाराष्ट्र खाकी – छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील तररने येथे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली . या चकमकीमध्ये 5 जवान शहीद झाले आणि 2 नक्षलवादी ठार झाले आहेत. ‘आज तक’ने दिलेल्या व्रत्तनुसार बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षविरोधी अभियानामध्ये एसटीएफ,डीआरबी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे 400 जवान सहभागी झाले होते. शोध अभियानादरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर
नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला. यात दोन नक्षलवादी ठार झाले, तर पाच जवान शहीद झाले. तसेच 20 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एसपी मोहीत गर्ग यांनी दिली आहे.

तीन वर्षात 970 घटना घडल्या आहेत

गृहराज्यमंत्री जी. किशन रेट्टी यांनी फेब्रुवारीमध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नक्षली घटनांमध्ये घट झाली आहे. 2018 मध्ये 833 तर 2019 मध्ये 670 आमि 2020 मध्ये 665 घटना झाल्या. मात्र छत्तीसगडमध्ये नक्षलवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसले. 2018 ते 2020 या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये 970 नक्षली घटना झाल्या. यात 117 जवान शहीद झाले.

Most Popular

To Top