महाराष्ट्र खाकी (लातूर) – सध्या कोरोनाची वाढठी संख्या पाहता लॉकडाऊन, देशाची आणि राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अर्थवेवस्था आणि जनतेसाठी सरकारचे विशेष पॅकेज याची चर्चा आणि सल्ले देणे चालू आहे. असच सल्ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसरकारला बाहेरील देशाचे उदाहरण देऊन राज्यसरकारला ट्विटरच्या माध्यमातून सल्ला म्हणा किंवा सूचना दिल्या आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतात
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…
फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…
पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…
असे म्हणाले आणि सर्व स्तरातून त्यांच्या या ट्विट वर प्रतिक्रिया येऊ लागल्या त्यातील एक प्रतिक्रिया लातुर मधून विलासराव देशमुख यांच्या राजकीय तालमीत लहानाचे मोठे झालेलेले विलासराव देशमुखांचे भाच्चे अभिजित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली
काय हुशार माणूस आहे!!! सगळी उदाहरण देशांची दिली आहेत आणि सल्ला राज्य सरकारला देत आहेत.. खाली #CoronaInMaharshtra लिहिलं आहे..
राजकारण करताना सारासार विचार हरवतो का?
हा सगळा शहाणपणा प्रथम केंद्र सरकारला सुचवावा, राष्ट्र प्रथम वाले…
अशी प्रतिक्रिया दिली आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ट्याग केली.
अभिजित देशमुख यांची राजकारणावरची पकड आणि राजकारणाची आवड या अगोदर ही दिसून आली आहे. अभिजित देशमुखांचे राजकारणातील अंदाज 70 ते 80 %
बरोबर असतात हे लातूरच्या जनतेने अनुभवले आहे. अशा हुशार आणि अभ्यासू माणसाने लातूरच्या राजकारणात सक्रिय सहभाग असावा अशी लातूरकरांची इच्छा आहे !