लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी नाव न घेता कोणत्या आमदाराला टोमणे मारले आहे. स्वतःच्या पैशाने आमदारकीची निवडणूक लढवून बघ !

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर लोकसभा मतदारसंघ रूपाताई पाटील निलंगेकर यांनी जिंकल्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला आणि भाजपाकडून सुनील गायकवाड हे या जागी निवडणूक लढवू लागले पण त्यांच्यावर बरेच आरोप झाले की ते देशमुखांना मॅनेज होतात, गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे आहेत. विलासराव देशमुख यांच्यासाठी नकळत मदत करतात पण 2014 च्या निवडणुकीत सुनील गायकवाड यांनी विजय मिळवून रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या नंतर भाजपचा झेंडा लातूर लोकसभेवर फडकवला. सुनील गायकवाड हे एक शांत, अभ्यासू वेक्तीमत्व असलेला नेता म्हूणन लोकसभेत आणि राज्यात उदयास आले. सर्वात जास्त प्रजेंटी असलेले खासदार म्हणून त्याचा सत्कार आणि पारितोषिक मिळाले होते.2014 नंतर लातूर भाजपचा कारभार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हाती आला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच गमतीशीर आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी घडल्या लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या स्वरूपाने भाजपा मजबूत झाली होती. पण लोकसभा निवडणुकीत भाजपने सुनील गायकवाड यांना तिकीट नाकारून सुधाकर शृंगारे यांना दिले. सर्वांनाच आश्चर्य वाटले की अस का आणि कोणी केले ? मग संभाजी पाटील याच्यावर आरोप झाले की त्यानी सुधाकर शृंगारे यांच्याशी समजोता करून त्यांना तिकीट मिळवून देण्यास मदत केली! आणि मोठा आर्थिक फायदाही घेतला अशी लातूर जिल्ह्यात चर्चा चालू झाल्या आणि आहेत. सुनील गायकवाड यांनी त्यावेळेस काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती ते फक्त म्हणाले पक्षाने जो आदेश दिला आहे तो मी पाळीन आणि भाजपाच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करीन. पण मनात कुठेतरी असलेली ती सल, तो राग की एका वेक्तीमुळे आपल्याला तिकीट मिळाल नाही. याचा परिणाम दिसून येत होता पण बोलता येत नव्हते पण एक – दिड वर्ष होऊन गेले आणि दोन दिवसा खाली सुनील गायकवाड यांनी आपल्या फेसबुक च्या माद्यमातून एक पोस्ट केली आहे.”अरे स्वतःच्या पैशानी एकदा आमदारकी ची निवडनुक लढवुन बघ!
किती दिवस राखीव मतदार संघाच्या लोकप्रतिनीधि कड़ून पैसे घेउन लढ़नार आहेस!
” या पोस्ट चा अर्थ काय आणि माजी खासदारांनी कोणाकडे बोट दाखवल आहे ?
आणि आणखीन एक पोस्ट आज सोमवार 29/03/2021 रोजी केली आहे यात तर अभ्यासू माजी खासदार यांनी “एवढा हलकट
निर्लज्ज
स्वार्थी
भ्रष्ट
माणुस
जगाच्या पाटीवर ‘दूसरा’
शोधून मिळणार नाही.
…….

” अशी पोस्ट केली आहे. पण माजी खासदार हे त्या आमदाराचे नाव घेत नाहीत म्हणजे हे त्या आमदाराचे वजन आणि दबदबा दिसून येतो.

Recent Posts