महाराष्ट्र खाकी ( नांदेड ) – नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दरवर्षीप्रमाणे होळी आणि होला मोहल्ला साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक
बैठकांचे आयोजन केले होते. त्यात गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक ‘होला मोहल्ला सण साजरा करू असे सर्वानी
बैठकीत सांगितले होते. दुपारी नेहमी प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडला. गुरुद्वाराचे सर्व गेट पुलुप लावून बंद
करण्यात आले होते. परंतु उपस्थितांमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भाविकांना भडकावून तलवारी उपसून
गेटच्या दिशेने धाव घेतली. बंद गेट तोडले आणि गुरूद्वाराबाहेर येताच बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला
चढवला.संतप्त जमावाने पोलिसांची बॅरिकेड्स तोडून
गुरूद्वाराबाहेर असलेल्या पोलिसांवरच हल्ला केला. त्यात आठ पोलीस गंभीर जखमी झाले. जमावाने
पोलिसांच्या गाड्याचीही नासधूस केली.
![](https://maharashtrakhaki.in/wp-content/uploads/2021/03/IMG_20210330_143707-1024x646.jpg)
अंगरक्षकामुळे बचावले पोलीस अधीक्षक
रस्त्यावर आलेल्या मिरवणुकीतील एकाने पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर तलवारीने प्रहार केला. त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी शेवाळे यांच्या बचावासाठी धाव घेतली. त्यांच्यामुळे पांडे यांचा जीव वाचला परंतु तलवारीने त्यांच्या पाठीवर वार झाला.
त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात थोडक्यात बचावले. पोलिसांच्या आणि प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या अनेक गाडय़ा जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या.
![Maharashtra Khaki](https://maharashtrakhaki.in/wp-content/uploads/2021/04/Photo_1617293848152-150x150.png)