पोलीस

औरंगाबादचा तहसीलदार किशोर देशमुख दिड लाखाची लाच घेताना ACB ने पकडले.

महाराष्ट्र खाकी ( औरंगाबाद ) – औरंगाबाद शहराचा तहसीलदार किशोर देशमुख याला वाळू माफियाकडून 1 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या जालना पथकाने सोमवारी रात्री MTDC कार्यालय परिसरात ही कारवाई केली.पंधरा दिवसांपूर्वी तक्रार आली होती , अशी माहिती
ACB चे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली. त्यावरून वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी महिन्याला
हप्ता म्हणून तहसीलदार देशमुख याने लाच मागितल्याचे म्हटले होते. त्यावरून, लाचेच्या मागणीची
पडताळणी करण्यात आली. त्यात देशमुख याने दीड लाख रुपये मगितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी देशमुख याने पैसे घेताना तक्रारदाराला बऱ्याच ठिकाणी फिरवले. अखेर रात्री MTDC
कार्यालय परिसरात पैसे घेताच शंका आल्याने देशमुख हा पैसे घेऊन कारमधून घराकडे पळाला. पथकाने
विट्स हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

Most Popular

To Top