महाराष्ट्र

उस्मानाबाद मधील कळंबच्या नायब तहसीलदार परवीन उमर दराज खान 6,693/ रु.लाच स्वीकारताना ACB ने पकडले

महाराष्ट्र खाकी ( उस्मानाबाद ) – उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यातील तहसील कार्यालयात परवीन या नायब तहसीलदार महिला, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष याच्यासह तिघांना 6,693 रुपयांची लाच
घेताना ACB च्या पथकाने रंगेहात पकडले आहे. कोरोना काळात मोफत धान्य वाटप प्रकरणात
शासनाकडून आलेली मदत देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली आहे. नायब तहसीलदार अन दोन रेशन
धारक दुकानदाराना पकडल्याने तालुक्‍यात चर्च्या होत आहे. परविन उमर दराज खान पठाण (वय 47), श्रीरंग साधू डोंगरे (वय 64) आणि विलास ज्ञानोबा पिंगळे (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची
नावे आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.कळंब तालुक्‍यातील तहसील कार्यालयात परवीन या नायब तहसीलदार आहेत. तर श्रीरंग हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे.

तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले
होते. त्याचे प्रत्येकी 1 क्यूँटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. त्यानुसार तक्रारदार
यांना गेल्या तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल मंजूर झाले होते. ते बिल काढून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 6 हजार 693 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार
यांनी याबाबत ACB कडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. यानुसार झालेल्या
सापळा कारवाईत या तिघांना एकाच वेळी 6 हजार 700 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Most Popular

To Top