Home » पोलीस » Latur police news ​LCB PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस टीमचा मध्य प्रदेशात सर्जिकल स्ट्राइक, वेशांतर करून लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक

Latur police news ​LCB PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस टीमचा मध्य प्रदेशात सर्जिकल स्ट्राइक, वेशांतर करून लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक

महाराष्ट्र खाकी ( ​लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील शासकीय निवासस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरी झालेल्या खळबळजनक घरफोडीच्या गुन्ह्याचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात धाडसी आणि गोपनिय मोहीम राबवून पोलिसांनी एका परप्रांतीय अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे लातूर पोलिसांच्या खाकीचा दरारा आणि PI सुधाकर बावकर यांच्या धडाकेबाज कामाचा अनुभव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आरोपीचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग पाच ते ६ दिवस वेशांतर करून अत्यंत गोपनीय पद्धतीने थरारक मोहीम राबवली. केवळ बातमीदारांवर विसंबून न राहता तांत्रिक विश्लेषणाची जोड देत पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आलम सुरसिंग भुरिया (वय ४० वर्षे, रा. गुराडिया, तहसील कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) असे या जेरबंद केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्या झडतीत ५०० रुपयांच्या ३४० नोटा (एकूण १ लाख ७० हजार रुपये रोख) हस्तगत करण्यात आल्या आहेत.

​एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि LCB PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू होता. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारासह सुमारे वीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वसाहतीमधील बंद घरात हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. ​सध्या या प्रकरणातील दुसरा आरोपी ‘रमेश’ हा फरार असून, त्याच्याकडे उर्वरित रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आहेत. त्याचा कसून शोध घेतला जात असून, लवकरच त्यालाही बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हि कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (ज्यात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित कुमार पुणेकर आणि इतर पोलीस अंमलदार सामील होते) दाखवलेली धडाडी, गुप्तता आणि कर्तव्यतत्परता कौतुकास्पद ठरली आहे. ​फरार (आरोपी ) साथीदाराला लवकरच गजाआड करून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांची कसून छापेमारी सुरू आहे!

Share This News

Related Post

National