Home » पोलीस » Latur lcb police news Pi सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात लातूर LCB ची बसस्थानकांवर दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीवर धडाकेबाज कारवाई; १० लाखांचे सोने जप्त

Latur lcb police news Pi सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात लातूर LCB ची बसस्थानकांवर दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीवर धडाकेबाज कारवाई; १० लाखांचे सोने जप्त

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – ​गुन्हेमुक्त लातूर करण्यासाठी अग्रही आणि कार्य करत असलेले पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आणि LCB प्रमुख PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. LCB प्रमुख पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून दोन महिला चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे लातूर, अहमदपूर आणि भादा येथील चोरीच्या तब्बल आठ (०८) गुन्ह्यांची उकल झाली असून, १० लाख ६ हजार रुपये किमतीचे ७८.१५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

​पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली PI सुधाकर बावकर यांचे पथक बसस्थानक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी आणि आरोपींचा सुगावा लावण्यासाठी सक्रीय होते. दि. २ ऑक्टोबर रोजी मुरूड-अकोला बसस्थानक परिसरात दोन संशयित महिला वावरत असल्याची पक्की गोपनीय माहिती LCB च्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्वाती उर्फ रविना उमाकांत तपसाळे (वय ३५ वर्ष, रा. ठोंबरे नगर, मुरूड), महादेवी सर्जेराव देडे (वय ४० वर्ष, रा. न्यू जय नगर, लातूर) दोघींना ताब्यात घेतले. ​त्यांच्या पिशवीची पाहणी केली असता एका स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसांनी खाकीचा खाक्या दाखवताच महिलांनी लातूर जुने बसस्थानक, अहमदपूर आणि भादा बसस्थानकांवर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने लांबवल्याची कबुली दिली.

​​या कारवाईमुळे गांधी चौक पोलीस ठाण्यातील २, अहमदपूर पोलीस ठाण्यातील ४ आणि भादा पोलीस ठाण्यातील २ अशा एकूण ८ गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही महिलांना जप्त मुद्देमालासह गांधी चौक पोलीस ठाण्यात (गु.र.नं. २४६/२०२६, कलम ३०३(२) BNS) पुढील कारवाईसाठी वर्ग करण्यात आले आहे. ​LCB प्रमुख PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात API पांडुरंग माने, PSI अमर केंद्रे, आणि अंमलदार रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, सुरेश कलमे, राजेश कंचे, गोविंद येलमटे, आनंद हल्लाळे, प्रेमदास राठोड, गोविंद भोसले, तुळशीराम बरूरे, सुरेखा मदने, अंजली गायकवाड व चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई पार पाडली.

Share This News

Related Post

National