Home » पोलीस » 28 वर्षांपासून फरार आरोपीला LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात PSI संजय भोसले आणि पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी केली अटक

28 वर्षांपासून फरार आरोपीला LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात PSI संजय भोसले आणि पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी केली अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप ) –  LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात PSI संजय भोसले आणि पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला केले अटक, लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या सरकारी रकमेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीला यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. आरोपी संजय केशवराव देशपांडे (वय ६२, रा. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गांधी चौक पोलीस ठाण्यात १९९८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये (गु.र.नं. १०/१९९८) आरोपीविरुद्ध कलम ४०९, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये कारवाई सुरू होती. याशिवाय आर.सी.सी. क्र. ६१२/२००२ आणि डॉर्मंट फाईल क्र. ०१/२०१२ मध्येही त्याच्याविरुद्ध प्रकरण दाखल होते.
अपहाराची माहिती

हलगरा शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना संजय देशपांडे यांनी बचत खातेदारांच्या ठेवींमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचे तत्कालीन चौकशीत उघड झाले होते.
एल. डी. सूर्यवंशी (कनिष्ठ लिपिक, प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा) यांच्या आर.डी. खात्यातील रक्कम काढण्यासाठी आलेल्या अर्जानुसार रक्कम देण्याऐवजी आरोपीने बनावट स्वाक्षरी करून २,६८३ रुपयांचा अपहार केला.
के. एच. शिंगारे (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलगरा) यांच्या खात्यातील रक्कमही खोट्या कागदपत्रे व बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे काढून १४,६७८ रुपयांचा अपहार केला.

एकूण १७,३६१ रुपयांची सरकारी रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून आरोपीने पोस्ट खात्याची नोंदवही व कागदपत्रे बनावट तयार केल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधित खातेदारांनी विड्रॉल फॉर्मवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केले होते. प्रारंभी नाममात्र अटक झाल्यानंतर आरोपी न्यायालयीन कामकाजाला सातत्याने हुलकावणी देत फरार झाला होता. न्यायालयाने अटक वॉरंट आणि जाहीरनामा काढूनही तो २८ वर्षे पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

विशेष पथकाची कामगिरी
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. याच दरम्यान विशेष पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी औसा रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने सापळा रचला आणि आरोपीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. अटकेची ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले व पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी पार पाडली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई लातूर पोलिसांच्या फरार आरोपींवर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवाईचा भाग आहे.

Share This News

Related Post

National