छत्रपती संभाजीनगरच्या चार हवालदारांचा राज्यस्तरावर गौरव; उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह विभागाकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान
महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागात अत्यंत निष्ठा, कर्तव्यतत्परता आणि उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील चार हवालदारांचा दिमाखदार राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे. हवालदार संजय रावसाहेब खेडकर, नारायण सोनवणे, अंबरसिंग कारभारी नागलोत तसेच सेवानिवृत्त हवालदार बाबासाहेब गायकवाड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह…

