महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लोकनेते स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या शुभप्रसंगी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सहज मिळावा यासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर व नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. गोजमगुंडे म्हणाले, “सातत्याने कामात राहणारे आणि कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या स्व. अजित दादा पवार यांना या उपक्रमातून खऱ्या अर्थाने भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यात आली आहे.”
महसूल विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी या शिबिरात उपस्थित राहिले. नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. एकत्रित सेवेच्या माध्यमातून जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या समाधान शिबिरामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून, स्व. अजित दादा पवार यांच्या कार्यशीलतेला साजेसा जनकल्याणकारी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




