Home » पोलीस » वाढवणा पोलिसांची प्रभावी कारवाई; API सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जुगार अड्ड्यावर छापा, २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाढवणा पोलिसांची प्रभावी कारवाई; API सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जुगार अड्ड्यावर छापा, २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र खाकी (वाढवाना / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात अवैध जुगाराच्या अड्ड्यांना पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे. वाढवणा पोलिस स्टेशन (ता. उदगीर) च्या पथकाने मौजे नळगीर शिवारातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली चालणाऱ्या तिर्रट जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या धाडीत २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने जुगार खेळणाऱ्या टोळीवर धाड घातली. घटनास्थळावरून तीन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

अटक झालेले आरोपी
नामदेव प्रल्हाद पवार (वय २५, रा. नळगीर तांडा, ता. उदगीर)
संजय काशीराम राठोड (वय ५१, रा. धर्मा तांडा (गुत्ती), ता. जळकोट)
दगडोबा गोविंद गोतावळे (वय ५२, रा. सोनावळा, ता. जळकोट)
फरार आरोपी (शोध सुरू):
रंजीत मरेपा मोटेवाड (रा. जळकोट)
सुदर्शन देव मूलशंकर कापसे (रा. नळगीर, ता. उदगीर)
दीपक सूर्यकांत गायकवाड (रा. नळगीर, ता. उदगीर)
संतोष माधवराव बिजले (रा. नळगीर, ता. उदगीर)
गणेश बालाजी पेदावाड (रा. नळगीर, ता. उदगीर)

जप्त मुद्देमाल
रोख रक्कम : ₹१५,५००
२ चारचाकी वाहने (किंमत ₹२०,५०,०००)
४ दुचाकी (किंमत ₹२,७०,०००)
एकूण : ₹२३,३५,५००

या प्रकरणी वाढवणा पोलिस स्टेशन गु.र.नं. २२०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२(अ) अंतर्गत ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मधुकर हालसे तर तपास पोलीस अमलदार इकरम उजडे करत आहेत.लातूर जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार, मटका आणि अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने आक्रमक मोहीम हाती घेतली असून, अशा धंद्यांमध्ये गुंतलेल्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. API सुनील गायकवाड यांची ही कारवाई जुगाराच्या अड्ड्यांना दिलेला जोरदार दणका मानला जात आहे.

Share This News

Related Post

National