Home » पोलीस » लातूर LCB आणि किल्लारी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या; २१ गुन्हे उघडकीस, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर

लातूर LCB आणि किल्लारी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या; २१ गुन्हे उघडकीस, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर

महाराष्ट्र खाकी (किल्लारी / विवेक जगताप ) – महावितरणच्या वीजतारांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर लातूर जिल्हा पोलिसांनी मोठा हल्ला चढवला आहे. लातूर LCB (स्थानिक गुन्हे शाखा) आणि किल्लारी पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवघ्या काही तासांत दोन मुख्य आरोपींना जेरबंद करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपींनी किल्लारी पोलिस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणात ही आक्रमक मोहीम राबवण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात किल्लारी पोलीस स्टेशन API महावीर जाधव यांच्या विशेष पथकाने आरोपींच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवली होती. कारवाईची थरारक कहाणी १२ जुलै २०२६ रोजी किल्लारी गावात संशयित इसम फिरत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ धडक दिली आणि आकाश गोपाळ देंडे (वय ३१, रा. किल्लारीवाडी, ता. औसा) याला पकडले. चौकशीत त्याने वीजतार चोरीची कबुली दिली आणि आपल्या साथीदाराची माहिती उघड केली. त्यानुसार दुसरा आरोपी अविनाश अजाप्पा कोमारे (वय २५, रा. शिवनगर, ता. निलंगा) यालाही अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला चोरीचे विद्युत तारे (महावितरण) – किंमत २ लाख ४८ हजार रुपये चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल – किंमत ५० हजार रुपये मालवाहू छोटा हत्ती (ट्रक) – किंमत २ लाख ५० हजार रुपये एकूण मुद्देमाल : सुमारे ५ लाख रुपये २१ गुन्ह्यांची कबुली तपासादरम्यान आरोपींनी किल्लारी पोलिस स्टेशनमधील गु.र.नं. २५/२०२६, ७०/२०२६, ८९/२०२६, १०४/२०२६, १४३/२०२६, २४१ ते २४५/२०२६ (कलम १३६ वीज अधिनियम) या गुन्ह्यांसह ११ अदखलपात्र मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. म्हणजे एकूण २१ गुन्हे या टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले की, मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना कठोर आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू आहे. या टोळीतील इतर फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांनाही जेरबंद केले जाईल.

किल्लारी पोलिस स्टेशन  सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव, पोलिस उपनिरीक्षक किशन मरडे, सहाय्यक फौजदार गणेश यादव, अमलदार महेश पवार, शिवप्रसाद करके, कृष्णा गायकवाड, नितीन चव्हाण, शिरसमकर, आकाश सरतापे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस अंमलदार राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, रसूल पठाण ही कारवाई लातूर पोलिस दलाच्या आक्रमक आणि समन्वयित कामगिरीचे उत्तम उदाहरण आहे.

Share This News

Related Post

National