Home » महाराष्ट्र » पिंपरी -चिंचवड शहराला ‘हरित व स्मार्ट शहर’ बनवण्यासाठी महापौर रवी लांडगे यांचे ठोस पाऊल; मेट्रो परिसरात उभी करणार चार्जिंग स्टेशन!

पिंपरी -चिंचवड शहराला ‘हरित व स्मार्ट शहर’ बनवण्यासाठी महापौर रवी लांडगे यांचे ठोस पाऊल; मेट्रो परिसरात उभी करणार चार्जिंग स्टेशन!

महाराष्ट्र खाकी (पिंपरी -चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड  शहरातील प्रवाशांना आणि वाहनधारकांना अधिक सुलभ, आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने एक स्तुत्य व दूरदर्शी निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील मेट्रो स्थानकांच्या परिसरात इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक उच्चस्तरीय संयुक्त आढावा बैठक पार पडली.
भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराचा गांभीर्याने विचार करून, या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख मुद्दे व ठळक वैशिष्ट्ये
1) योग्य ठिकाणांची निवड  वाहनधारकांना सहज उपलब्ध होतील अशा सोयीस्कर मेट्रो स्थानक परिसरत अचूक निवड करणे.
2)  पायाभूत सुविधा व वीजपुरवठा चार्जिंग स्टेशनसाठी लागणारा अखंडित वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता वेळेत करणे.
3) अंमलबजावणीची कार्यपद्धती प्रकल्पाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी स्पष्ट व प्रभावी कार्यपद्धती ठरवणे.
4) हरित व स्मार्ट सिटीचे स्वप्न पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला बळकट करत पिंपरी-चिंचवड शहराला देशातील अग्रगण्य ‘हरित व स्मार्ट शहर’ म्हणून विकसित करणे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी महापालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत प्रशंसनीय असून, यामुळे ई-वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे.

Share This News

Related Post

National