महाराष्ट्र खाकी ( पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) –
शहरातील रस्त्यांच्या दुरस्तीबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नगरसेवक यश साने यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी खड्डे बुजवताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, कायमस्वरूपी आणि उच्च दर्जेदार दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. सध्या प्रभागातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे महापालिकेच्या माध्यमातून ‘वेट मिक्स’ टाकून बुजविण्यात येत आहेत. मात्र, एकच पाऊस झाल्यानंतर आरएमसीमधील सिमेंट वाहून जात असून पुन्हा केवळ खडी शिल्लक राहत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत आहेत. या गंभीर समस्येकडे नगरसेवक यश साने यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगरसेवक यश साने यांचे बैठकीतील प्रमुख ठळक मुद्दे
1) तात्पुरत्या उपायांना विरोध – खड्डे बुजवताना केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम भूमिका नगरसेवक यश साने यांनी घेतली.
2) नागरिकांच्या तक्रारींची दखल – आरएमसीमधील सिमेंट पावसानंतर वाहून जात असून केवळ खडी शिल्लक राहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींवर प्रशासनाचे लक्ष वेधले.
3) तातडीने पाहणीचे आदेश – पावसाळ्यात नागरिक आणि वाहनचालकांना त्रास होऊ नये, म्हणून संबंधित ठिकाणांची पाहणी करून योग्य त्या तांत्रिक पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले.
येत्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक आणि विशेषतः दुचाकीस्वारांना कोणत्याही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करावी. तसेच, योग्य तांत्रिक पद्धतीचा आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून खड्डे त्वरित बुजवावेत, अशा स्पष्ट व सक्त सूचना नगरसेवक यश साने यांनी दिल्या आहेत.




