महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औसा विधानसभा मतदारसंघात आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान आणि संवाद सोहळा बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) बेलकुंड येथील विशाल मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात सुमारे १५० महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.
महिलांच्या कार्याचा गौरव आणि प्रेरणादायी संवाद
क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमात ‘कर्मयोगिनी अस्मिता विकास मंचा’च्या अध्यक्षा शोभा पवार यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या महिलांशी त्यांनी विशेष संवाद साधत त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
या वेळी कर्मयोगिनी अस्मिता विकास मंचा’च्या अध्यक्षा शोभा पवार, औसा पंचायत समितीच्या सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील,भाजप प्रदेश सचिव कल्पना डांगे,संजय कुलकर्णी,पंचायत समिती सदस्य समाधान कांबळे, भाग्यश्री यादव, परमेश्वर लांडगे, भाग्यश्री साळुंके,सरपंच विष्णू कोळी, तालुका आरोग्य अधिकारी देवणीकर या दिमाखदार सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते, यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रराबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असून, उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे.




