Home » शिक्षण » NEET, CBI LATUR माजी महापौर विक्रांत गोजामगुंडे यांचा इशारा, लातूर पॅटर्न = मेहनत, रक्त आणि घाम, एक-दोन लोकांमुळे लातूर पॅटर्न ची बदनामी करू नका – मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे

NEET, CBI LATUR माजी महापौर विक्रांत गोजामगुंडे यांचा इशारा, लातूर पॅटर्न = मेहनत, रक्त आणि घाम, एक-दोन लोकांमुळे लातूर पॅटर्न ची बदनामी करू नका – मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – NEET पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या घाणेरड्या कृत्यामागे दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यात शंका नाही. परंतु या प्रकरणात RCC कोचिंगचे प्रा. मोटेगावकर आणि कुलकर्णी यांना CBI ने अटक केल्याचा मुद्दा पुढे करून लातूर पॅटर्नला बदनाम करण्याचा घाणेरडा प्रयत्न सुरू झाला आहे. ही निंदनीय बाब आहे असे विक्रांत गोजमगुंडे यांनी पोस्ट मधून मत वेक्त केले.

लातूर पॅटर्न म्हणजे केवळ मोटेगावकर किंवा कुलकर्णी नव्हेत.
लातूर पॅटर्न हा महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव आहे. रात्रंदिवस मेहनत करणारे हजारो विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, मार्गदर्शक आणि शैक्षणिक संस्थांचे सामूहिक प्रयत्न यातून हा पॅटर्न उभा राहिला आहे. यामुळे असंख्य गरिबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजामगुंडे यांनीही याच मुद्द्यावर आक्रमक पोस्ट करत म्हटले आहे की, “लातूर पॅटर्न जयते! लातूर पॅटर्न म्हणजे मोटेगावकर किंवा कुलकर्णी नव्हेत ”

एक-दोन व्यक्तींनी केलेल्या गैरप्रकारामुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक परंपरेवर, मेहनती विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर शंकेचा काळा डाग लावणे हा सर्वात मोठा अन्याय आहे. ही बदनामी लातूरच्या भावी पिढीच्या भविष्यावरही घाला घालणारी आहे भावना स्पष्ट आहे दोषींना शिक्षा व्हावी, पण लातूर पॅटर्नला बदनाम होऊ देऊ नका, लातूर पॅटर्न हा अभिमान आहे, प्रेरणा आहे आणि महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आहे. आता संयमाने, सत्याच्या बाजूने आणि लातूरच्या गौरवासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे असे आवाहन माजी महापौर विक्रांत गोजामगुंडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

National