महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / लातूर ) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायाविरुद्ध राबवल्या जाणाऱ्या मोहिमेत पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने किनवट येथे धडाकेबाज कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३१ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या मोहिमेच्या १६ व्या दिवशी, किनवट पोलीस ठाण्याच्या दत्तनगर गोकुंदा भागातील तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ₹३,८८,९०० रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मोहिमेतील धडक कारवाया
मटका-जुगार: ३३ आरोपींविरुद्ध १२ गुन्हे, ₹११,८६,३९० मुद्देमाल जप्त
अवैध दारू विक्री: ७९ आरोपींविरुद्ध ७८ गुन्हे, ₹८,०४,२४६ मुद्देमाल जप्त
अवैध गुटखा विक्री: २ आरोपी, ₹१,०८,९९० जप्त
अवैध वाळू उपसा: २ गुन्हे, ₹३०,१५,००० मुद्देमाल जप्त
एकूण १०३ गुन्हे दाखल, १२६ इसमांविरुद्ध कारवाई, एकूण ₹५३,९३,११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध धंदे चालवणाऱ्या टोळ्यांना मोठा धडा शिकवला आहे. नांदेड परिक्षेत्रात अवैध जुगार, दारू, गुटखा आणि वाळू माफियांच्या विरोधात ही मोहीम कठोरपणे सुरू राहणार आहेत.



