महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेला जिल्हा आहे. लातूर पॅटर्न संपूर्ण राज्यात आणि देशात प्रसिद्ध आहे. लातूर मध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्यातून आणि परराज्यातून विद्यार्थी येतात. लातूर पॅटर्न ची जशी एक चांगली बाजू आहे तशीच त्याची दुसरी बाजू पण आहे. ति म्हणजे गुन्हेगारीची लातूर शहरातील अष्टविनायक
परिसरात सर्व क्लासेस भरतात तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. लातूर शहरातील या ट्युशनएरियात मागील काही काळात मोठे गुन्हे घडले होते . अपहरण, खंडणी आणि खून असे मोठे गुन्हे घडले होते. लोक हे विसरत नाही तोपर्यंत याच ट्युशनएरियात इंस्टाग्रामवरून शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरून बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं फिल्मी स्टाईल
अपहरण करण्यात आलं. ही टोळी एवढ्यावर थांबली नाहीतर चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकूण अकरा जणांनी मिळून हा प्रकार केल्याचं समोर आलं असून त्याचा धक्कादायक आणि अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा
आरोपींचा कट उधळला असला तरी या आरोपींनी क्रूरतेची सीमा ओलांडली आहे.यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत तर इतर आरोपी त्यांचे हस्तक म्हणून काम करतात. या प्रकरणी पाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय तर इतर सहा आरोपी अद्यापही फरार आहेत.








