आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निटूर येथील ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिर व तपोनिधी सांबस्वामी महाराज मध्ये महाअभिषेक व आरती

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंञी तथा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा तालुक्यातील निटूर येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिर व तपोनिधी सांबस्वामी महाराज मंदिरात त्यांच्या दिर्घायुष्यासाठी चांगले आरोग्य लाभो याकरिता महाअभिषेक व आरती

करण्यात आले आहे. निटूर येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अशोक शिंदे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सादनाथ मंदिरात भाजपा कार्यकर्त्यांसमावेत महाअभिषक व आरती करण्यात आली आहे.अशोक शिंदे संवाद साधताना म्हणाले आदरणीय माजी खा.रूपाताई ( अक्का ) पाटील निलंगेकर,माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या

संकल्पनेतून आम्ही घडलेले कार्यकर्ते असल्याने शेतकर्‍यांचे खरे कैवारी जरी कोण असतील तर आमचे नेते माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर असल्याची खंत त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केले.त्यांच्या आरोग्यासाठी दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी साकडे घालण्यासाठी आमच्या ग्रामदैवतास आरतीच्या प्रसंगी नतमस्तक होऊन केले.तसेच,तपोनिधी

सांबस्वामी महाराज येथे आरती करून आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक व आरती करून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घोषणा देऊन.. जय जय कार.. करण्यात आला. याप्रसंगी,भारतीय जनता पार्टीचे लातूर सचिव पंकज कुलकर्णी,उपसरपंच संगमेश्वर करंजे,विजयकुमार देशमुख,आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे

स्वियसहायक दत्ता शिंदे,राजकुमार सोनी,शिवराज सोमवंशी,विठ्ठल बुडगे,अंकुश कवडे,कांत बुडगे,सुरेंद्र करंजे,दत्ता जगदाळे,प्रशांत निटूरे,भरत उकळे,विराप्पा बुडगे आदीं जणांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.