SP अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणी LCB प्रमुख बावकरांच्या नेतृत्वात पोलिसांची IPL सट्टा टोळीवर सलग दुसरी धडक कारवाई, चार आरोपींना १३.७ लाखांच्या मुद्देमाला सह अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) –  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने IPL सट्टा टोळीवर सलग दुसरी धडाकेबाज कारवाई केली, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध सट्टेबाजीवर सातत्याने आक्रमक मोहीम राबवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई रोड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चपळाईने सापळा रचत चार आरोपींना चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी
1) सचीन प्रकाश वलसे (४७ वर्षे), रा. मयूरवन, अंबेजोगाई रोड, लातूर
2) किरणकुमार अर्जुन केंद्रे (४१ वर्षे), रा. कृपा सदन रोड, गणेश मेडिकल जवळ, लातूर
3) गंगाधर रामराव घाडगे (५१ वर्षे), रा. होळी, ता. लोदगा, जि. लातूर
4) मनीष श्रीकांत पंचाक्षरी (३७ वर्षे), रा. खडक हनुमान, दयाराम रोड, लातूर

या आरोपींनी “सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स” या आयपीएल सामन्यावर मोबाईल फोन आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे सट्टा घेत लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली होती. पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपींकडून विविध मोबाईल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा नोंदी आणि क्रेटा कार (MH 26 BT 9909) असा एकूण १३,७३,०९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लातूर पोलिस दलाने अवैध जुगार आणि सट्टेबाजीच्या विरोधात दाखवलेल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध सट्टा व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, युवकांना या व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.

सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख यांचे विशेष अभिनंदन, लातूर पोलिस दल सतत “झटका देतो, गुन्हेगारी थांबवतो” अशा आक्रमक पवित्र्यात काम करत आहे. अशीच कठोर कारवाई अवैध व्यवसायांवर सुरू राहील, असे स्पष्ट संदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कडून इशारा दिला आहे.

Recent Posts